#राष्ट्रप्रथम #सैनिक_कृतज्ञता_निधी #राजकारणाचा_फड - Awareness Campaign - iSupportCause

#राष्ट्रप्रथम #सैनिक_कृतज्ञता_निधी #राजकारणाचा_फड

मित्रांनो काही दिवसांपुर्वी कश्मीर येथील पुलवामामध्ये आतंकवादी हल्ला झाला आणि त्यात आपण आपले CRPFचे ४४ जवान गमावले... आपला मित्र जाधव गुलाबसिंग हा सुद्धा CRPF मध्ये कार्यरत असल्याने त्याच्याकडून सुद्धा घडल्या प्रकाराची माहिती घेतली... त्यानंतर संपुर्ण देशात एकीकडे दुखद वातावरण होतं तर दुसरीकडे पाकिस्तानबद्दल चीड सुद्धा होती... आपण सर्वांनीच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली... आता य़ा हल्ल्याच पाकिस्तानला किंवा आतंकवाद्यांना काय प्रतिउत्तर द्यायचं हे सरकार बघेल आणि सगळ्या देशवासीयांनी अश्या वेळी सरकारच्या मागे पक्षभेद विसरून उभं रहायला पाहिजे जे सगळे देशबांधव करत आहेत.... याचबरोबर तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या कुटुंबांनी आपल्या घरातील कर्ते पुरुष देशसेवा करतांना गमावले त्यांच्या प्रति आपण आपली कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली पाहिजे.... मित्रांनो जगाच्या पाठीवर हाच एक जॉब असा आहे जो पूर्णपणे निस्वार्थी आहे... ज्यात इतर लोकांच्या संरक्षणार्थ आपला जीव जाऊ शकतो याची कल्पना जवानांना असते तरी आपल्या वैयक्तिक जवाबदाऱ्या बाजूला ठेवून ही लोकं वेळप्रसंगी आपल्या जीवाची बाजी लावतात... अश्या वेळी सरकारकडून, इतर संस्थाकडून मदत जाहीर केली जाते परंतु घरातील कर्ता पुरुष गेला की त्याची किंमत पैश्यात कधीच मोजता येत नसते.... तर जी लोकं अशी निस्वार्थी भावना ठेवून प्रसंगी देशासाठी, आपल्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतात त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या प्रति आपण सुद्धा कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे.. याचं भावनेतून Arvind काकांनी आपण आपल्या समूहातर्फे शहीद जवानांना शक्य होईल तितकी मदत करायला हवी अशी कल्पना मांडली.. नंतर यावर फडाची मॉड टीम, गटनेते, उत्कर्ष सामजिक संस्थेतील मित्रमंडळी यांच्याबरोबर चर्चा करून हा उपक्रम हाती घ्यायच ठरवलं.... त्यानंतर आपण पुन्हा गुलाबच्या मदतीने शहीद जवानांपैकी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवान HC GD संजय राजपूत (लखानी, मलकापुर रोड) आणि CT GD नितीन राठोड (चोरपांगरा, लोणार, बुलढाणा) य़ा दोघांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि संपुर्ण माहिती घेतली... आपण जी काही मदत जमवणार आहोत ती विभागून थेट य़ा दोन्ही शहीद जवानांच्या वीरपत्नींच्या नावे देणार आहोत आणि यांत शेवटपर्यंत गुलाबची मदत घेणार आहोत... आपला मॉडरेटर आशुतोष आणि त्याची मित्रमंडळी चालवत असलेला सामजिक ग्रुप इन्कलाब हा सुद्धा आपल्या बरोबर य़ा उपक्रमात भाग घेणार असं आशुतोषने कळवलं म्हणून आलेल्या मदतीचा track नीट ठेवता यावा यासाठी आपण आशुतोष यांच्या मातोश्रींचा अकाउंट नंबर वापरणार आहोत.... कोणी किती मदत केलीय याची एक लिस्ट आपण मेंटेन करणार आणि शेवटच्या दिवशी ती आपण सर्वांसमोर ठेवणार आहोत...

#राष्ट्रप्रथम #सैनिक_कृतज्ञता_निधी #राजकारणाचा_फड

Icon of Campaign
This is text visible on user image with options to display on bottom, left, right and top corners.
Your Image loading..

4 Support

Share this cause